मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी कारवाईचा धडका लावला आहे. तालुक्यातील अंतुर्ली, नारवेल शेत शिवारातील गावठी हातभट्टीवर कारवाई करत सुमारे १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, नारवेल शेत शिवारात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार होत असल्याची गोपनिय माहिती नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली. त्यानुसार दोन पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी बोरकर, मनुरे मेजर यांच्या इतर १० पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी १० एप्रिल रोजी दुपारी अंतुर्ली व नारवेल शेत शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून सुमारे १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील दारू बनविण्याचे कच्चे व पक्के रसायन नष्ट केले आहे. या करवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.