जळगाव : प्रतिनिधी
आव्हाणे रोड परिसरातील रोहनवाडीत एका महिलेला शिक्षिकेचा पत्ता न दिल्याच्या रागातून चार महिलांनी घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांत चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सुनंदा आनंदा निकम (वय ५७, रा. रोहनवाडी, आव्हाणे शिवार) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे मंगल मुरलीधर सुरवाडे, अश्विनी शालिक सुरवाडे, गीता धनराज वाघ आणि सरिता संजय दांडगे (सर्व रा. महादेव नगर, कानळदा रोड, जळगाव) या चार महिला त्यांच्या घरात घुसल्या. त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. यात नातीलाही मारहाण केली.