अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील ओम साई श्रद्धा नगरमधून अज्ञात चोरट्यांनी एक चार चाकी चोरून नेल्याची घटना २४ रोजी रात्री घडली. या संदर्भात प्रवीण हरिश्चंद्र ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे. यात प्रवीण ठाकूर यांचे मेव्हणे मनीष राजाराम पवार यांची सुमारे दीड लाखाची चारचाकी (एमएच १८, एजे- ३११०) वर ठाकूर हे त्यांच्या परिवाराला अमळनेर येथे आले होते. तर त्यांचे मेहुणे कामानिमित्त दिल्लीत गेल्याने त्यांनी चारचाकी अमळनेर येथे प्रवीण ठाकूर यांच्या घरासमोर लावली होती. पहाटे ५ वाजता ते लघु शंकेला उठले असता त्यांना चारचाकी दिसली नाही. याबाबत ठाकूर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पो.उ.नि. राजू जाधव करत आहेत. दरम्यान, पो.नि. दत्तात्रय निकम यांनी पो.उ.नि. भगवान शिरसाठ, हे. कॉ. मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, उज्ज्वल म्हस्के, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, नीलेश मोरे, रवी पाटील, अमोल पाटील, एलसीबी पथकाचे प्रवीण मांडोळे, संदीप पाटील, राहुल कोळी यांचे पथके चोराच्या शोधासाठी रवाना केले आहेत. दरम्यान, टाकरखेडा येथून ही मनोहर विश्वास पाटील यांची ४० हजारांची दुचाकी (एमएच- १९, ईक्यू ८७४६) घराबाहेर लावली होती. पहाटे ३ वाजता त्यांना दुचाकी चोरी झाल्याचे समजले. याबाबत पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.