चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला अमळनेर येथील एक तरुण पळवून नेत असताना काही सजग तरुणांनी त्याला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील बँड पथकाचा मालक अस्लमअली युसूफअली सय्यद (२९) याची ओळख तालुक्यातील अल्पवयीन झाली. मुलीशी संशयित हा मुलीच्या संपर्कात होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने या मुलीस यावल भागात बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. संशयित हा विवाहित असून, त्यास तीन अपत्ये असल्याची माहिती पोलिस तपासात पढे आली आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अस्लमअली सय्यद याच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. त्याला २८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोउनि जितेंद्र वलटे करीत आहेत.
यातील युसूफअली सय्यद याने या अल्पवयीन मुलीस २३ रोजी चोपडा येथे बोलावले. मुलीने सकाळी क्लासला जायचे निमित्त करीत चोपडा गाठले. दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ते आले असता, तिथे असलेल्या काही तरुणांना संशय आल्याने त्यांनी या दोघांना शहर पोलिस ठाण्यात आणले