• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

नाशिक विभागात प्रथम क्रमांकाची कामगिरी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गौरव

editor desk by editor desk
May 24, 2025
in जळगाव, राज्य, सामाजिक
0
अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

जळगाव, दि. २४ मे (जिमाका वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत अमळनेर उपविभागाने उल्लेखनीय कामगिरीची नोंद करत संपूर्ण नाशिक विभागात सर्वोत्तम उपविभाग म्हणून आपली वेगळी छाप पाडली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचा सन्मान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. विभागीय आयुक्त नाशिक डॉ. प्रवीण गेडाम यांची या वेळी विशेष उपस्थिती होती.

‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत विविध महसूल विषयक उपक्रम, नागरिक केंद्रित सेवा, दस्ताऐवजांचे सुलभीकरण, ई-हक्क नोंदणी, महसूल अभिलेखांचे अद्ययावतकरण, जलद निर्णय प्रक्रिया, वादांचे त्वरित निराकरण, तक्रार निवारण यंत्रणा यासारख्या बाबींमध्ये अमळनेर उपविभागाने उल्लेखनीय प्रगती साधली. उत्कृष्ट नियोजन, गतिमान अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून या यशाला गवसणी घालता आली.

हा सन्मान म्हणजे अमळनेर उपविभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून प्रशासनात नवी कार्यसंस्कृती आणि पारदर्शकतेचा संदेश देणारा आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी वर्ग, लिपिक, कोतवाल, ग्रामसेवक आदी सर्व घटकांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले.

यावेळी जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांचाही स्वतंत्रपणे गौरव करण्यात आला. महसूल प्रशासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गाव नकाशे, फेरफार नोंद, जमिनीच्या मोजण्या, तसेच स्थानिक पातळीवरील लोकाभिमुख उपक्रम यामध्ये त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय ठरले.

या यशस्वी कामगिरीमुळे अमळनेर उपविभागाने महसूल कार्यप्रणालीच्या उत्कृष्टतेचे एक नवे प्रतिमान उभे केले असून राज्यातील इतर उपविभागांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.

Previous Post

जालन्यानजीक भीषण अपघात : मायलेकींचा मृत्यू तर दोन गंभीर !

Next Post

कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा.

Next Post
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !

कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !
क्राईम

सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !

July 14, 2025
भुसावळातील दोघांवर हद्दपारीची कारवाई !
क्राईम

जळगावातील दोघांना जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार !

July 14, 2025
कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !
क्राईम

कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !

July 14, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
क्राईम

खळबळजनक : सोशल मिडीयावर झाली ओळख : तरुणीला जळगावात बोलवून केला अत्याचार !

July 14, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

तुम्ही तुमच्या कामातून वरिष्ठांना इम्प्रेस कराल. बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस उत्तम राहणार !

July 14, 2025
संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना कार्यकर्त्यांनी फासलं काळं
क्राईम

संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना कार्यकर्त्यांनी फासलं काळं

July 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group