जालना : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना उघडकीस येत असतांना आता जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात मायलेकींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंजना पुरुषोत्तम सापनर (वय ३०), अनुसया पुरुषोत्तम सापनर (वय १४ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली) असं अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत.
या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून जवळपास सहा जण किरकोळ जखमी झाले आहे आहे. ही घटना मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास सुखापुरी फाट्यावर अंबड – वडीगोद्री रोडवर घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड वरून जालना कडे येणारी ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात मायलेकींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले असून सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अंबड येथील शासकीय आणि जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.