• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पाऊल - पालकमंत्री गुलाबराव पाटील

editor desk by editor desk
May 23, 2025
in जळगाव, राज्य
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

जळगाव दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : सामान्य जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, यासाठी शासनातर्फे आयोजित करण्यात येणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पावले असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, हा या उपक्रमामागील खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी (ता. धरणगाव) येथील शासकीय विश्रामगृहात महसूल विभागाच्या वतीने आयोजित शिबिरात विविध शासकीय योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरजू नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

शिबिरातील महत्त्वाचे उपक्रम व लाभ :
शिबिरात एकूण ८८५ शासकीय दाखले (जात, उत्पन्न, शैक्षणिक, नॉन क्रिमीलेयर) वितरित करण्यात आले. ‘सुलभ शेतकरी योजना’ अंतर्गत तालुक्यातील १३५९ व पाळधी मंडळातील २५२ गटांमध्ये ‘तुकडा’ शेरा कमी करून सुधारित सातबारा उतारे शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले. ‘जिवंत सातबारा मोहिमे’ अंतर्गत ४३७ मयत खातेदारांच्या वारसांची नोंद घेऊन फेरफार दाखले तयार करण्यात आले.

‘संजय गांधी निराधार योजना’ अंतर्गत १६,१७६ लाभार्थ्यांपैकी १४,००० जणांना थेट बँक खात्यात लाभ जमा करण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांचे कामकाज शिबिरात सुरू आहे. महिला शेतकरी मुक्ताबाई अर्जुन सूर्यवंशी यांना यांत्रिक सहाय्य म्हणून १.२५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. घरकुल योजनेंतर्गत तालुक्यातील ४,७३२ लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाच्या निर्णयानुसार प्रारंभी २० लाभार्थ्यांना वाळू वितरित करण्यात आली.

प्रशासनाचा लोकांशी थेट संवाद :
शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचले असून, नागरिकांच्या अडचणी तत्काळ मार्गी लावण्यात आल्या. प्रशासन व जनतेतील विश्वास दृढ करणारा हा उपक्रम ठरला.

उपस्थित मान्यवर :
या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच विजय पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, उपअभियंता एस. डी. पाटील, शेतकी संघाचे संजय महाजन, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, आबा माळी, कल्पेश कोळी, महेश शिंपी, समाधान माळी, अनिल माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी केले, तर आभार प्रभारी तहसीलदार संदीप मोरे यांनी मानले.

 

Previous Post

खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

Next Post

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

Next Post
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना कार्यकर्त्यांनी फासलं काळं
क्राईम

संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना कार्यकर्त्यांनी फासलं काळं

July 13, 2025
मोठी दुर्घटना :  मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !
क्राईम

मोठी दुर्घटना : मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !

July 13, 2025
मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !
क्राईम

मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !

July 13, 2025
भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !
क्राईम

भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !

July 13, 2025
अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !
क्राईम

अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !

July 13, 2025
विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !
क्राईम

विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !

July 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group