Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महाराष्ट्रातील सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण !
    क्राईम

    महाराष्ट्रातील सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण !

    editor deskBy editor deskMay 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. छत्रू परिसरातील सिंहपोरा भागात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीवरून लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, देशासाठी लढताना महाराष्ट्रातील सुपुत्राला वीरमरण आले. संदीप गायकवाड असे शहीद जवानाचे नाव आहे.

    शहीद जवान संदीप गायकर हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या करंडी गावचे रहिवासी होते. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी मराठा रेजिमेंटच्या आरआर बटालियनमध्ये लष्करी सेवेत प्रवेश केला होता. गुरुवारी दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगरातील अकोले येथील ब्राम्हणवाडा येथे उद्या आणण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील , पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच गावात शोककळा पसरली.

    मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास किश्तवाडच्या सिंहपोरा-छत्रू परिसरात लष्कराच्या दोन पॅरा एसएफ, 11 आरआर, सातवी आसाम रायफल्स आणि स्थानिक पोलिसांच्या विशेष गट एसओजीने संयुक्त कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांच्या गटाला घेरून शोधमोहीम सुरू असताना अचानक गोळीबार सुरू झाला. चकमकीत जवान संदीप गायकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले.

    भारतीय लष्कराच्या व्हाइट नाइट कोअरने सोशल मीडियावर चकमकीची माहिती दिलीय. त्यात एक जवान शहीद झाल्याचे सांगितले. गुरुवारी सकाळी किश्तवाडच्या छत्रू येथे पोलिसांसोबत संयुक्त मोहिम राबवत होते. त्यावेळी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. अजूनही गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात एक जवान गंभीर जखमी झाला होता. पण उपचारादरम्यान त्याला वीरमरण आले असे, व्हाइट नाइट कोअरने सांगितले आहे.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.