चोपडा : प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील वढजाई येथील केटर्स २२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील चहार्डी येथे मालवाहूक रिक्षाने जात होते. ही रिक्षा सावखेड्याजवळ उलटल्याने रिक्षातील ११ जण जखमी झाले आहेत. त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रिक्षा उलटून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील वढजाई येथील कुंदनबाई दिनेश खैरे (वय ५५), अर्चना खंडू कुवर (वय ३८), हिरकन बन्सिलाल ठाकरे (वय ६०), सरला संदीप खैरे (वय ४०), सुशीलाबाई सुकदेव वाघ (वय ७०), मीराबाई गोकुळ वानखेडे (वय ४५), वनराज गुलाब माळी (वय २६), कल्पना कृष्णा आखाडे (वय ५६), दीपक संदीप खैरे (वय १५), वंदना बाळू निकम (वय ४६), मनीषा चंद्रभान कुवर (वय ३५) हे सर्व जखमी झाले आहेत. वढजाई येथून केटरिंग कामासाठी हे सर्व प्रवासी तालुक्यातील चहार्डी येथे जात होते.
या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या बाजूने रिक्षा काढत असताना सावखेडा येथील इंद्रायणी हॉटेलजवळ ही रिक्षा उलटली. यात रिक्षातील ११ जण जखमी झालेत. तर रिक्षातील केटरिंगचे सर्व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरले होते. दरम्यान, सर्व जखमींना उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.