जळगाव : प्रतिनिधी
तू मातून गेला आहे तुला बघतोच म्हणत छत्री लावण्यासाठी काढलेल्या काठीने मधूकर चिंतामणी वाणी (वय ५५, रा. ईश्वर कॉलनी) यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा हात फॅक्चर झाला. ही घटना दि. २१ रोजी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास भजेगल्लीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात संशयित हर्षल विजय चौरसिया (रा. नाथवाडा, सिंधी कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ईश्वर कॉलनीतील लाठी शाळेजवळ मधुकर चिंतामणी वाणी हे वात्तसतव्यास असून त्यांचे भजेगल्लीत कटलरी साहित्य विक्री करुन उदनिर्वाह करतात. दि. २१ रोजी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे गाडी लावली. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा हर्षल चौरसिया हा तेथे आला. त्याने काहीही कारण नसतांना मधुकर वाणी यांना तू मातून गेला आहे, तुला बघतोच असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी वाणी यांनी दुकानाची छत्री लावण्याकरीता ठेवलेली काठीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
काठीने वाणी यांना मारहाण केल्यामुळे त्यांच्या बरगड्यांसह हाताला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा हात फॅक्चर झाला. मारहाण केल्यानंतर हर्षल चौरसीया याने वाणी यांना आज सोडतो, उद्या जर तू येथे दिसला, तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देखील दिली. दरम्यान, वाणी यांनी जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित हर्षल विजय चौरसिया रा. नाथवाडा सिंधी कॉलनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.