मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडच्या क्षेत्रात अनेक अभिनेते व अभिनेत्री चर्चेत येत असतांना आता बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने चित्रपटसृष्टीला कायमचा निरोप दिला आहे. हा धक्कादायक खुलासा तिचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी केला आहे. एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी सांगितले की, अथिया यापुढे चित्रपटांमध्ये काम करू इच्छित नाही आणि तिने तिच्या करिअरसाठी नवीन मार्ग निवडला आहे. वयाच्या
2015 मध्ये सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ चित्रपटातून अथिया शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या करिअरची सुरुवात खूपच चर्चेत होती, पण त्यानंतर ती बॉलिवूडमधील मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली. ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाली. तिच्या या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यानंतर आता अवघ्या ३२ व्या वर्षी अथियाने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. Athiya shetty
एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, “एक दिवस अथियाने मला सांगितले, ‘बाबा, मला आता चित्रपट करायचे नाहीत,’ आणि तिने तिचा निर्णय घेतला. मी तिला कधीही अडवले नाही. तिने इतरांचे ऐकण्याऐवजी स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला, याचे मला कौतुक वाटते. अथियाला अनेक चित्रपटांच्या ऑफर होत्या, पण तिने त्या नाकारल्या,’ असेही त्यांनी सांगितले.
अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलशी लग्न केले असून, ती आता तिच्या कौटुंबिक जीवनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. नुकतेच अथिया एका गोड मुलीची आई देखील झाली आहे. मात्र बॉलीवूडपासून दुर होण्याच्या अथियाच्या निर्णयाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. परंतु तिच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक करुन सपोर्ट केला आहे.