Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरगुती वाद वाढला : पतीने केला पत्नीवर हातोड्याने हल्ला !
    क्राईम

    घरगुती वाद वाढला : पतीने केला पत्नीवर हातोड्याने हल्ला !

    editor deskBy editor deskMay 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    पतीने घरगुती कारणावरून झोपलेल्या पत्नीवर लोखंडी हातोड्याने हल्ला करत जबर जखमी केल्याची घटना २० मे रोजी पहाटेच्या सुमारास किन्ही एमआयडीसी परिसरातील एका बांधकामस्थळी पत्र्याच्या शेडमध्ये घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादीच्या माहितीनुसार, संशयित आरोपी संतोष लालिया खर्ते (रा. रूकगड, म.प्र, ह.मु, किन्ही एमआयडीसी) हा दि. २० मेच्या रात्री १ ते ३ वाजण्याच्या सुमारास पत्री शेडमध्ये झोपलेल्या पत्नी आशाबाईकडे आला. घरगुती कारवावरुन त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात संतोषने लोखंडी हातोड्याने आशाबाईच्या डाव्या कानाजवळ जोरदार मारहाण केली. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपीने वापरलेला हातोडा घटनास्थळी टाकून पळ काढला.  दरम्यान, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जखमी बहिणीचा भाऊ राजेश नहारसिंग बारेला (२८, रा. हिंगोणा, ता. यावल, मूळ रा. सातताली, ता. झिरण्या, जि. खरगोन, म.प्र.) यांनी तक्रार दिली आहे.  त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स.पो.नि. नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.