धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील चमगाव येथील धनराज योगराज सावंत (वय ४९) यांनी चमगाव शिवारातील स्वतःच्या शेतात कांदा चाळीजवळ विषारी कीटकनाशक औषध सेवन केल्याने १९ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. त्यांच्या शेतात पीक न आल्याने त्यांनी विष प्राशन केल्याचे समजते. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.