यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील कोरपावली येथून पुतण्या काकूला घेऊन यावल बसस्थानकावर येत असताना शहराच्या बाहेर तालुका कृषी कार्यालयाच्यासमोर स्कूलबसने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ६:४५ वाजता झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोरपावली येथील रहिवासी विशाल कुशल येवले हा युवक मंगळवारी पहाटे काकू निशा जितेंद्र येवले (वय २०) यांना दुचाकीने (एमपी ०७ एनपी ३०७२) यावल बसस्थानकावर सोडण्यासाठी येत असताना त्यांना बसची (एमएच १९ वाय ७१९८) धडक बसली. या अपघातामध्ये विशाल येवले व निशा येवले दोघे जागीच ठार झाले. रवी भालेराव, उमेश जावळे यांच्या मदतीने मृतदेह तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या अपघातप्रकरणी कुशल पांडुरंग येवले यांच्या फिर्यादीवरून स्कूल बसवरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.