• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय !

editor desk by editor desk
May 20, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय !

मुंबई  : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मंत्रिमंडळाने धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 52,720 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात आयोजित एका छोटेखानी सोहळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

खाली वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, पण संक्षिप्त स्वरुपात

  • कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच 1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी (विधी व न्याय विभाग)
  • बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार (नगरविकास विभाग)
  • उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
  • राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर
  • ‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीद. 70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम (गृहनिर्माण विभाग)
  • सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
  • अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी 2025.64 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
  • पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 6394.13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
  • शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 4869.72 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)

 

Previous Post

अवकाळी पावसाचा कहर : वीज कोसळून ४० वर्षीय शेतकरी ठार !

Next Post

खळबळजनक : भरधाव बसने दुचाकीला नेले फरफटत : दोन ठार !

Next Post
खळबळजनक : भरधाव बसने दुचाकीला नेले फरफटत : दोन ठार !

खळबळजनक : भरधाव बसने दुचाकीला नेले फरफटत : दोन ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न ; रोहित पवारांचा हल्लाबोल !
राजकारण

सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न ; रोहित पवारांचा हल्लाबोल !

July 12, 2025
मनोज जरांगे पाटील आक्रमक : आता सरकारला संधी द्यायची नाही !
राजकारण

मनोज जरांगे पाटील आक्रमक : आता सरकारला संधी द्यायची नाही !

July 12, 2025
ते विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
राजकारण

ते विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

July 12, 2025
सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल !
क्राईम

अल्पवयीन मुलाचे अश्लील व्हिडीओ काढले : दोघांवर गुन्हा दाखल !

July 12, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून ६०  हजारांचा मुद्देमाल लंपास !

July 12, 2025
१५ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत दुर्देवी मृत्यू !
क्राईम

१५ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत दुर्देवी मृत्यू !

July 12, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group