मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (मंगळवार) मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार यावर चर्चेचं वर्तुळ होतं. अखेर अजित पवार गटाने अनुभवसंपन्न आणि ओबीसी समाजातील प्रभावशाली नेते असलेल्या भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. डिसेंबर 2024 मध्ये 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. डिसेंबर 2024 मध्ये 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भूजबळ यांच्याव्यतिरिक्त अजून कोणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात. 1973 साली त्यांनी शिवसेनेतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्याच वर्षी ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले आणि 1973 ते 1984 या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळली.
1985 मध्ये ते मुंबईचे महापौर झाले आणि 1991 मध्ये पुन्हा एकदा महापौरपद भूषवले. याच काळात त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून नव्या पक्षात प्रवेश केला. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत.