रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील खिर्डी येथील शेती शिवारात निंभोरा पोलिसांनी दोन गावठी पिस्तुलासह एकास अटक केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीचे नाव अनिल रामलाल बारेला असे आहे.
सविस्तर वृत्त असे कि, खिर्डी खुर्द शिवारात शेतकरी निळकंठ पुंडलिक बढे यांच्या मालकीच्या शेतातील घराजवळ एक व्यक्ती दहशत माजविण्याच्या उद्देश्याने दोन गावठी पिस्तूल बाळगून असल्याची माहिती निंभोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत झडती घेतली असता दोन गावठी पिस्तूल मॅक्झिनसह मिळून आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभय ढाकणे, हवालदार योगेश चौधरी, पो. ना. सुरेश पवार, अमोल वाघ, सरफराज तडवी, रशीद तडवी, प्रभाकर ढसाळ, रशीद तडवी या पथकाने केली. आरोपी अनिला बारेला यास रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.