जळगाव प्रतिनिधी । तरसोद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खान्देश अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटीच्या थकबाकीदारांना निवडणूकीस अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी तक्रारदार अनिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खान्देश अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी जळगाव यामधील थकबाकीदार तीन कर्जदार यांनी सोसायटीमधून कर्ज घेतले आहे. परंतू अद्यापपर्यंत मुद्दल रकमेसह व्याजाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. यात किशोर भाऊराव पाटील, अशोक रूपसिंग अलकरी आणि छायाबाई अशोक अलकरी यांचा समोवश आहे. तिघांना तरसोद विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीसाठी अपात्र करण्यात यावे अशी मागणी तक्रारदार अनिल संभाजी पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी खान्देश अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीने दिलेल्या दाखल जोडला आहे.