• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात एक लाख सदस्य नोंदणीचे केले आवाहन

editor desk by editor desk
May 19, 2025
in जळगाव, राज्य
0
शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव  : प्रतिनिधी

“ना झुके हैं, ना बिके हैं, ना टूटे हैं, हम बाळासाहेब के चेले हैं, खुलकर लड़े हैं और खुलकर जिए हैं !” या जोशपूर्ण शायरीने सुरुवात करत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या संवाद मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जनतेच्या हृदयाशी जोडलेली आहे. शिवसेना म्हणजे चळवळ, शिवसेना म्हणजे जनतेच्या मनातील ताकद.” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना आगामी नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणीकडे असलेल्या उदासीनतेवर त्यांनी खंत व्यक्त करत सांगितले, “शिवसेना ही केवळ निवडणूक जिंकण्याची यंत्रणा नाही. ती बाळासाहेब ठाकरे यांची चळवळ आहे. पदाधिकाऱ्यांनी ‘सामाजिक कार्य हाच श्वास’ या भावनेने समाजात काम करावं.” “मतदारसंघ निहाय संपर्क मोहिम राबवा, गट-गणनिहाय नियोजन करा. बूथ कमिट्या, महिला आघाडी, युवासेना यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या सोपवा. किमान एक लाख कार्यकर्त्यांची विक्रमी नोंदणी करण्यासाठी कामाला लागा.” असे प्रभावी आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या संवाद मेळाव्याच्या सुरुवातीस शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर यांनी केले तर आभार उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे यांनी मानले.

यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी बोलताना सांगितले की, “गुलाबभाऊंनी जातीपातीच्या पलिकडे जाऊन विकासासाठी झटत नेतृत्व केलं. शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घ्यावी.” तसेच मुंबईप्रमाणे जळगाव ग्रामीणमध्येही लवकरच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा प्रमुख संजय पाटील सर, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनीही मनोगत व्यक्त केले.

यांचा झाला शिवसेनेत प्रवेश
ग्रामीण भागातील युवा नेतृत्व आकाश अनिल सोनवणे, रवींद्र पवार, अनिल राठोड, पंकज चव्हाण, ओम पवार, शुभम सोनवणे, दादू जाधव यांच्यासह वकील संघटनेचेसर्व ऍड. आशिष पाटील, धीरज पांडे , सावता माळी , प्रवीण येवले, उमेश सनंसे, भावेश सोनवणे, पंकज सवर्णे, कोमल काळे, पवन सोनी, चांगदेव दांडगे, हर्षल संत, राजेश हरणे, श्याम शिंदे, रवींद्र रडे या सर्व वकील मंडळींनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे भगवा रुमाल गळ्यात घालून स्वागत केले.

मेळाव्यास उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, युवा सेनेचे विस्तारक किशोर भोसले, तालुका प्रमूख शिवराज पाटील, डी.ओ.पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, उप जिल्हा प्रमूख रवींद्र कापडणे, महानगर प्रमूख संतोषआप्पा पाटील, शहर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन ढाके, अनिल भोळे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सपकाळे, VJNT चे राजू पाटील, डॉ. कमलाकर पाटील, धोंडू जगताप, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजय महाजन , रामकृष्ण काटोले, उपतालुका प्रमूख जितू पाटील, प्रमोद सोनवणे, प्रविण परदेशी, राजू पाटील कैलास चौधरी, समाधान चिंचोरे, महिला आघाडीच्या शितलताई चींचोरे, माजी सभापती ललिताताई कोळी, ज्योतीताई शिवदे, ज्योतीताई चव्हाण, मुरलीधर पाटील, गोपाल जीभाऊ, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे, जितू गवळी, लाडकी बहिण अध्यक्ष अर्जुन पाटील, सुरेश भापसे, पि.के. पाटील, ब्रिजलाल पाटील आदींसह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !

Next Post

सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !

Next Post
सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !

सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आता अजानही मराठीतून झाली पाहिजे ;मंत्री राणेंचे विधान !
राजकारण

आता अजानही मराठीतून झाली पाहिजे ;मंत्री राणेंचे विधान !

July 17, 2025
राज्याच्या विधानसभेत हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग !
राजकारण

राज्याच्या विधानसभेत हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग !

July 17, 2025
दिंडोरी-कळवण रस्त्यावर भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

दिंडोरी-कळवण रस्त्यावर भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू !

July 17, 2025
मोठी बातमी : भाजप नेते राणेंच्या अडचणीत वाढ !
क्राईम

मोठी बातमी : भाजप नेते राणेंच्या अडचणीत वाढ !

July 17, 2025
चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई : ७ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त !
क्राईम

चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई : ७ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त !

July 17, 2025
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित
क्राईम

पाच पोलिसांना मोठा दंड : वाचा काय आहे प्रकरण !

July 17, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp