पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील बिल्दी फाट्याजवळ बसने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १८ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, असलम शहा सलीम शहा (वय ३६, रा. रोहीण खेडा, बुलढाणा ह. मु. मुस्लिम मोहल्ला, किनगाव ता. यावल) हे १८ मे रोजी पाचोऱ्याहुन जळगावच्या दिशेने मोटरसायकलने जात असताना पाचोरा तालुक्यातील बिल्दी फाट्याजवळ जळगावकडुन पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या बसने असलम शहा यांच्या मोटरसायकलला धडक दिली.
या अपघातात असलम शहा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेतून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो. नि. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए. पी. आय. सुनिल सोनवणे हे करीत आहे.