Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी
    जळगाव

    जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी

    editor deskBy editor deskMay 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    संसदेत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी दिला जाणारा संसदरत्न पुरस्कार २०२५ यंदा जाहीर झाला असून, महाराष्ट्राने यामध्ये बाजी मारली आहे. राज्यातील सात खासदारांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

    यंदा ज्या महाराष्ट्रातील खासदारांची निवड झाली आहे, त्यात पुढील नावे आहेत:
    • सुप्रिया सुळे
    • श्रीरंग बारणे
    • अरविंद सावंत
    • नरेश म्हस्के
    • स्मिता वाघ
    • मेधा कुलकर्णी
    • वर्षा गायकवाड

    तसेच इतर देशपातळीवरील नेत्यांमध्ये भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवर आधारित असून, प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी दिले जातात. संसदेत उपस्थिती, प्रश्न विचारणे, चर्चा आणि विधेयक मांडणे यावरून खासदारांची कामगिरी तपासून हे पुरस्कार जाहीर केले जातात.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.