Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी !
    क्राईम

    खळबळजनक : ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी !

    editor deskBy editor deskMay 17, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतल्यानंतर देशासह राज्यातील प्रमुख शहरे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल.

    मुंबई विमानतळ आणि ताजमहल पॅलेसला बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू झाला आहे. असे सांगितले जात आहे की ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांना “अन्यायाने फाशी दिल्याचा” उल्लेख करत ही धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.

    धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण मुंबईत लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलवर डॉग स्क्वॉडच्या पथकाने प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाले आहेत. यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात विशेष खबरदारी घेतली जात आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. मृतांमध्ये अनेकजण महाराष्ट्रातील होते. भारताने या हल्ल्याचा बदला पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून घेतला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते, ज्यामध्ये 100 हून अधिक लोक मारले गेले होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.