जळगाव : प्रतिनिधी
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या दगडी बँकेची नोकर भरती प्रक्रिया ऑफलाइनची औपचारिकता सुरू झाली आहे. कंपनीच्या चर्चेसाठी व काही डीलिंग साठी जिल्हा बँकेतील प्रमुखासह चार्जेस चार ज्येष्ठ संचालकांनी दिल्लीत जाऊन संबंधित कंपनीशी चर्चा केली आहे. त्यानंतर कागदावर आकडेमोड सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात रेट देखील अंतर्गत फुटलेला आहे. पुन्हा जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुणांची गर्दी दगडी बँकेच्या पुढार्यांच्या दारात उभी झाली आहे.
दगडी बँकेत अंतर्गत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये देखील खुली ऑफर सर्व संचालकांना दिली गेली त्यामुळे अंतर्गत आर्थिक गुदगुल्या अनेकांना फुटले आहे. जे सहा महिन्यापूर्वी एकमेकांचे खडे फोडत होते आता मात्र ते गळ्यात गड्या घालून दिल्ली वारी करून आले आहे हे विशेष. शेवटी पैसा बोलतो या जगात पैशालाच किंमत आहे हे सिद्ध झाले आहे. तुम्ही आपण सर्व भाऊ मिळून मिसळून खाऊ असा प्रकार दगडी बँकेत सुरू झाला असल्याचे निदर्शनात येत आहे.
संचालक मंडळाच्या पहिल्या मिटींगला नोकर भरती ला काहींनी विरोध केला मात्र नंतर आकडेवारी समोर ठेवल्यानंतर दिलदारपणे सही केली असे काहींच्या बाबतीत घडले आहे. जिथे पवार असतात तेथे सबकुछ मुमकिन कीन होतं. दगडी बँकेच्या इतिहासात सर्वांचे तोंड विरोधाला असताना देखील एका दिशेने धवू लागले आहे शेवटी आर्थिक लालसेने एकत्र झालेले दिसून येत आहे. दगडी बँकेची आर्थिक परिस्थिती शी कुणाला देवाण-घेवाण नाही एनपीए किती टक्के झाला याच्या देखील सोयर कुणाला नाही. असो ही फिक्सिंग दगडी बँकेची इतिहासात गाजणारे आहे. यात मात्र सर्वसामान्य बेरोजगार तरुण भरडले जाणार आहेत एवढे मात्र निश्चित.