एरंडोल तालुक्यातील श्री सुकेश्वर येथील घटना
जळगाव : प्रतिनिधी प्रवीण पाटील
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचे वातावरण असताना आता एक धक्कादायक बातमी एरंडोल तालुक्यातून समोर आली आहे. श्री.सुकेश्वर देवस्थान येथे आज दि.१६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास एका ४० वर्षीय प्रौढांच्या अंगावर वीज पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मयताच्या घरी पोहचताच एकच आक्रोश झाल्याचे बघायला मिळाले.
सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल तालुक्यातील व म्हसावद येथून जवळ असलेल्या श्री.सुकेश्वर देवस्थान येथे आज दि.१६ मे रोजी संध्याकाळी ४:३०ते ५:००च्या सुमारास धरणगाव तालुक्यातील कमतवाडी येथील रहिवासी शरद रामा भिल वय (वर्षे ४०) प्रौढ हे गेल्या दोन ते तीन दिवसापासून खर्ची खुर्द येथे सासरे शंकर श्रावण ठाकरे यांच्या घरी परिवारासह आले होते. आज दि.१६ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शरद भालेराव हे आपले मोठे सासरे सुकेश्वर मंदिर परिसरातील देविदास ठाकरे यांच्या घरी भेटण्यासाठी आलेले असताना अचानक विज कोसळुन शरद रामा भिल यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती खर्ची खुर्द पोलीस पाटील यांनी एरंडोल पोलिस स्टेशन येथे कळविली. या घटनेची माहिती मिळताच. एरंडोल पोलिस स्टेशन A.S.I. महेंद्रसिगं पाटील व हवालदार राजेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व पुढील कार्यवाहीस सुरुवात केली.