जामनेर प्रतिनिधी । जामनेर – बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेलसमोरून गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या वरणगावातील तरुणाला अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे.
अनुराग लक्ष्मण सूनगत वय 20 राहणार वरणगाव ग्रामीण रुग्णालय कर्मचारी क्वार्टर वरणगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई जामनेर-बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेल समोर सार्वजनिक रस्त्यावर संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत हा तरुण हातात गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. मंगळवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत (वय-२०) रा. वरणगाव ग्रामीण रुग्णालय कर्मचारी क्वॉटर वरणगाव यास अटक करण्यात आली तसेच आरोपीकडून २० हजार रुपये किंमतीची गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आली.