मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटासोबत शरद पवार यांचा गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार शरद पवार आमच्यासोबत आले असते तर देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही पवारांचे स्वागतच आहे. खासदार पवारआणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रच होते, आजही एकत्र आहेत. अजित पवारांचे म्हणणे एकच होतेकी शिवसेना तुम्हाला चालते तरभाजप का चालत नाही? तेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांद्या लावूनदेशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीआले असते तर देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. अजूनही वेळ गेलेली नाही शरद पवार व अजित पवार एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा मिळत असेल तरपवारांचे स्वागतच असल्याचा पुनरुच्चारही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला.
जालन्यातील आरपीआय कार्यकर्ते गणेश रत्नपारखेयांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी ते गुरुवारी जालन्यात आले होते. पाकिस्तान दहशतवाद्यांनाप्रोत्साहन देणारा देश आहे. युद्धाची आवश्यकताअजिबात नाही, पाकव्याप्त काश्मीर आम्हाला मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. युद्ध विरामाचीविनंती पाकिस्तानकडून करण्यात आली असून त्यांनीहार मान्य केल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यात आला पाहिजे, त्यासाठी युद्ध केलं पाहिजे, वेळ आली तर पाकिस्तान ताब्यात घेतले पाहिजे अशी भूमिका मी अनेकवेळा मांडलेली आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प किंवा अन्य कोणाची मध्यस्थी यामध्ये नको आहे. दहशतवादी कारवाया थांबवल्या व पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर थेट भारत पाकिस्तानबरोबर चर्चा करायला तयार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले.
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाटयांच्या खात्याचा गोरगरिबांचा निधीलाडक्या बहिणीकडे वळवणे योग्यनाही. समाजकल्याण व्यतिरिक्त इतरअनेक मोठी खाती आहेत, त्याखात्याचा निधी लाडक्या बहिणींकडेवळवला पाहिजे. कर्नाटकमध्येसामाजिक खात्याचा निधी कुठेवळवता येणार नाही, असा कायदाआहे. महाराष्ट्र सरकारनेही तसाकायदा करावा. तसेच लाडक्याबहिणींना आर्थिक परिस्थितीसुधारल्यानंतर २१०० रुपये देऊ असेआश्वासन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री अजितपवार व एकनाथ शिंदे यांनी दिलेआहे. लवकरच त्यांना २१०० रुपयेमिळतील अशी अपेक्षा आहे, असे आठवले म्हणाले.