अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील सानेनगर परिसरात लग्नाच्या दोनच दिवस आधी एका तरुणीने गळफास आत्महत्या घेऊन केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दीपाली सुभाष पाटील (वय २२) या तरुणीने १५ मे रोजी पहाटे ३:४० वाजता स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपालीचा विवाह गडखांब येथील एका तरुणाशी १७ मे रोजी ठरलेला होता. त्यानिमित्त १५ तारखेला तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १४ तारखेला रात्री तिच्या घरी संगीताचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दीपालीने स्वतः नृत्यही केले होते. घरात आनंदाचे वातावरण असतानाच पहाटे अचानक ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दीपालीची आई पहाटे उठल्यावर तिला मुलगी घरात कुठेही दिसून आली नाही. शेजारी असलेल्या खोलीत त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, दीपालीने गळफास लावल्याचे दिसले.