• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात गुंडांच्या टोळक्याने घातला हैदोस : मध्यरात्री तीन घरांवर चढविला सशस्त्र हल्ला !

editor desk by editor desk
May 16, 2025
in क्राईम, जळगाव
0
जळगावात गुंडांच्या टोळक्याने घातला हैदोस : मध्यरात्री तीन घरांवर चढविला सशस्त्र हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

तुकारामवाडी परिसरात खुनाच्या रागातून गुंडांच्या एका टोळक्याने हैदोस घातल्याची घटना गुरुवारी पहाटे २:३० वाजेच्या घडली. तुकारामवाडी व सम्राट कॉलनीतील तीन घरांवर सशस्त्र हल्ला चढवला. लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर करत मालमत्तेचे नुकसान केले. घरात घुसून महिलांना अश्लील शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही जणांना ताब्यात घेतले आहे.

शारदा ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा आकाश व टिनू गोसावी यांच्यात चार ते पाच वर्षापासून सुरेश ओतारी यांच्या खुनाच्या रागातून वाद सुरू आहे. याच रागातून टिनू गोसावी आणि त्याच्या साथीदारांनी पहाटे त्यांच्या घरावर हल्ला केला. टोळक्याने बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील महिलांना शिवीगाळ केली. घरासमोर लावलेल्या दुचाकीचे नुकसान केले. शारदा यांच्या घराच्या मागच्या गल्लीत राहणाऱ्या रुपाली विजय पवार यांच्या घरातील कुलर, वॉशिंग मशीन व पाण्याच्या टाक्या फोडल्या.

संबंधितांनी तुकारामवाडीतच नाही तर सम्राट कॉलनीत राहणाऱ्या सविता भगवान महाजन यांच्या घराच्या खिडकीची काच आणि घरासमोर लावलेली दुचाकी व सायकलवर दगड व लाकडी दांडके मारून त्यांचेही नुकसान केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकूर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टिनू भिमराव गोसावी, मुन्ना पहेलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी यांच्यासह इतर पाच ते सहा जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजेंद्र उगले हे करत आहेत.

Previous Post

वऱ्हाड निघाले लग्नाला अन घरी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

Next Post

महत्वाची अपडेट ; ‘शांताबाई’ सह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल !

Next Post
चोपड्यात शासकीय डॉक्टरांना धक्काबुक्की ; पोलिसात गुन्हा दाखल

महत्वाची अपडेट ; ‘शांताबाई’ सह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group