मेष राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज वेळ अनुकूल आहे. आपल्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन केल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता . रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्नाचे स्रोत वाढतील तसाच खर्चही वाढेल. वैयक्तिक गोष्टींमध्ये बाहेरच्यांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. मार्केटिंगकडे अधिक लक्ष द्या. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील.
वृषभ राशी
श्रीगणेश सांगतात की, जवळच्या नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. जोखमीच्या गोष्टींमध्ये रस असेल तर यश मिळेल. अहंकार व आत्मविश्वासावर ताबा ठेवा. आपली ऊर्जा सकारात्मक मार्गाने वापरा. व्यवसायात थोडासा मंदीचा काळ येऊ शकतो. पती-पत्नीचे संबंध अधिक घनिष्ठ होतील. सांधेदुखीची जुनी समस्या वाढू शकते.
मिथुन राशी
आज कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कुटुंबात सुरु असलेले गैरसमज कोणाच्या तरी हस्तक्षेपामुळे दूर होतील. आपल्या कौशल्य आणि प्रतिभेमुळे यश मिळेल. हा कठोर परिश्रम करण्याचा काळ आहे आळस टाळा. विद्यार्थी व तरुणांनी अभ्यास व करिअरकडे लक्ष द्यावे. मनोरंजनात वेळ घालवू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यवसायात जनसंपर्क संबंधित कामात चांगले परिणाम मिळतील. अतिकामाकडे कुटुंबाला वेळ देता येणार नाही. चिडचिड व तणाव कार्यक्षमतेत अडथळा ठरू शकतो.
कर्क राशी
श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस वैयक्तिक व कौटुंबिक कामांसोबत चांगला जाईल. घरासाठी ऑनलाइन खरेदी होईल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद व प्रेम लाभदायक ठरेल. विचार व स्वभावावर नियंत्रण ठेवा. सौम्य स्वभावामुळे काम अपूर्ण राहू शकते, चिंता करू नका. कुटुंबीयांचे सहकार्य राहील. शेजाऱ्यांशी वाद टाळा. सध्या व्यवसाय प्रवास टाळावा. पती-पत्नी परस्पर समजुतीने कौटुंबिक प्रश्न सोडवू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
सिंह राशी
आजचा जास्तीत जास्त वेळ वैयक्तिक व कौटुंबिक कामांमध्ये जाईल. तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे सामाजिक कार्यात वर्चस्व राहील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. अनोळखी व्यक्तींवर अति विश्वास ठेवू नका. सध्या इतरांशी योग्य अंतर राखा. जमीन खरेदी-विक्री टाळा. मंदीच्या काळात व्यवसाय सुरळीत राहील. घरात शांततेचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या राशी
श्रीगणेश म्हणतात की, नव्या गोष्टी स्वीकारणे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल. मुलांच्या शिक्षण व करिअरशी संबंधित महत्त्वाचे काम पूर्ण होईल. खर्च जास्त असल्यामुळे आर्थिक ताण येईल. संयम ठेवा. जोखमीच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करू नका. व्यवसायाकडे अधिक गांभीर्याने व मेहनतीने लक्ष द्या. जोडीदार व कुटुंबासोबत सुखद वेळ जाईल. वाईट संगतीपासून दूर राहा.
तुळ राशी
श्रीगणेश सांगतात की, एखाद्या विशेष कामात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत लागेल; पण यश नक्की मिळेल. नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर वेळ योग्य आहे. गरजांवर नियंत्रण ठेवा, कारण अनावश्यक खर्च होऊ शकतो. कोणाच्याही कामात अति हस्तक्षेप करू नका. अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. मुलांच्या अडचणी समजून घ्या. व्यवसाय प्रवास टाळा. घरचे वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज कोणताही वाद चर्चेतून सोडवाल. एखाद्या शुभचिंतकाचे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यदायक ठरतील. मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते. खर्च जास्त होईल. कोणत्याही वैयक्तिक विषयात विनाकारण सल्ला देऊ नका. एखाद्या नातेवाइकाला मदत करताना आपल्या बजेटचा विचार करा. व्यवसाय वाढवण्यासाठी भागीदारीचा निर्णय घ्यायचा असल्यास तो सकारात्मक ठरेल. घरातील समन्वय टिकून राहील. आरोग्य चांगले राहील.
धनु राशी
श्रीगणेश सांगतात की, ग्रहस्थिती अनुकूल आहे. तुमच्या कौशल्य व प्रतिभेने योग्य फळ मिळेल. प्रगतीचा मार्ग खुला आहे. तरुण वर्गाचे प्रोजेक्ट पूर्ण होतील व मानसिक समाधान मिळेल. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवा. अहंकार व रागावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी वाद होऊ शकतात. व्यवसायात केलेले काम योग्य फल देईल. कौटुंबिक व वैयक्तिक बाबतीत बाहेरच्यांना हस्तक्षेप करू देऊ नका. हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता.
मकर राशी
श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही आपल्या क्षमतेनुसार काम पूर्ण कराल. कामाचे ओझे अधिक असेल; पण त्याचे फल मिळाल्याने थकवा जाणवणार नाही. योजनांच्या सुरुवातीस अडचणी येतील. निर्णय विचारपूर्वक घ्या. तरुण वर्गाने चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये. व्यवसायातील निर्णय स्वतः घ्या. पती-पत्नीमध्ये योग्य समन्वय राहील. मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
कुंभ राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज मनोरंजनात वेळ जाईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. अति कामामुळे तणाव येऊ शकतो. आपल्या योजनांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. व्यापारात क्षेत्र विस्ताराचे काम यशस्वी होईल. अधिक कमाईचा मार्ग सापडेल. घरातील समस्येमुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. डोकेदुखी व मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
मीन राशी
आज प्रलंबित काम पूर्ण होवू शकते. सामाजिक कार्यात तुमचा विशेष सहभाग राहील. एखाद्या धार्मिक स्थळी वेळ घालवा. कोणाशीही वाद टाळा. भावंडांशी चांगले संबंध ठेवा. प्रवास टाळावा. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती घ्या, असा सल्ला श्रीगणेश देतात. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.