मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन नाच केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना एका लग्नाच्या वरातीत घडली असून, आमदार खरात हातात तलवार घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ खरात यांच्यासह अनिल गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी लग्नाच्या मिरवणुकीत हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी डान्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब उघडकीस आली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात हे एका लग्नाच्या वरातीत हातात तलवार घेऊन गाण्याच्या तलवार थिरकल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एका कार्यकर्त्याच्या कार्यक्रमात आमदार खरात यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी हातात तलवार घेऊन कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून मनसोक्त डान्स केला.मात्र, सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन डान्स करणं त्यांना भोवलं. सिद्धार्थ खरात हे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान, या आधी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.