जळगाव प्रतिनिधी । शहरातील दादा वाडी येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला चप्पलने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, कविता भगवान पाटील (वय-४५) रा. दादा वाडी जळगाव ह्या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार ३ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास लहान मुलांचे खेळण्याच्या कारणावरून भांडण झाले. या कारणावरून लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून कविता पाटील यांना लक्ष्मी विनोद (पुर्ण नाव माहित नाही.) यांनी तोंडावर चप्पल मारली व शिवीगाळ करून मारहाण केली. यात कविता पाटील ह्या जमीनीवर पडल्याने त्यांच्या डोक्यालाख मुक्का मार बसला आहे. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. कविता पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून लक्ष्मी विनोद (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. फौ. दिपक कोळी हे करीत आहे.