जळगाव : प्रतिनिधी
घरी जेवण झाल्यानंतर बाहेर जाऊन विष प्राशन करीत योगेश लीलाधर वाघोदे (३२, रा. आयोध्यानगर) या तरुणाने आत्महत्या केली. विषप्राशन करून आल्यानंतर हा तरुण आईजवळ येऊन बसला व त्यानंतर त्याला उलट्या झाल्या अन् तो गतप्राण झाला.
सविस्तर वृत्त असे कि, एका कंपनीत कामाला असलेला योगेश वाघोदे हा तरुण आई, पत्नी व मुलासह आयोध्यानगरमध्ये राहत होता. सहा महिन्यांपासून त्याची पत्नी मुलासह माहेरी गेलेली आहे. मंगळवारी या तरुणाने आईसोबत जेवण केले व नंतर तो बाहेर गेला. काही वेळाने तो घरी आला व दारात बसलेल्या आईजवळ बसला. त्याला उलट्या होऊ लागल्याने आईने इतरांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले.