रावेर : प्रतिनिधी
पशुधनाची हत्या केल्याप्रकरणी पती- पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजमाबी मोहम्मद हुसेन भतीयारा (३७) व तिचा पती मोहम्मद हुसेन मोहंमद अहमद (५१) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कुरेशी मोहल्ल्यात एक दाम्पत्य अवैध मांस विक्री करत असल्याची माहिती रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बुधवारी पहाटे धाड टाकली. त्यावेळी या दाम्पत्यास पकडण्यात आले. त्यांच्याकडून काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील तिसरा एकजण पसार झाला आहे. सरकारतर्फे पोकॉ. सचिन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत वरील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोना कल्पेश आमोदकर पुढील तपास करत आहेत. महिला सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख, पो.कॉ. प्रमोद पाटील, महेश मोगरे, पो.कॉ. विशाल पाटील, सुकेश तडवी, सचिन घुगे, श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.