नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रीसंधीनंतर सीमा भागामध्ये सध्या शांततेचे वातावरण आहे. मात्र यादरम्यान पाकिस्तानाला चीनचे समर्थन केले आहे. यानंतर आता चीन देखील आपल्या कुरपती सुरुच ठेवल्या आहेत. चीनकडून एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला असून चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगितला.तसेच येथील काही जागांची नावं बदलली आहेत.
चीनच्या या कृतीनंतर भारताकडून तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही असं म्हणत चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलली जाताच, भारताने परराष्ट्र मंत्रालयाने खडसावले आहे.
“अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनने केलेला प्रयत्न व्यर्थ आणि हास्यास्पद आहे. आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. रचनात्मक नामकरणाचं पाऊल वास्तव मात्र बदलू शकणार नाही की अरुणाचल प्रदेश हा भारताता एक अविभाज्य भाग होता, आहे आणि कायमच राहील,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले. India Vs China |
चीनमधील ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या एक्स-अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. ग्लोबल टाईम्सवर भारताविरुद्ध खोट्या बातम्या चालवल्याचा आरोप आहे. या कारणामुळे त्याच्या एक्स हँडलवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, चीनकडून सातत्याने अरुणालच प्रदेश हा दक्षिण तिबेटचा आणि पर्यायाने चीनचा भाग असल्याचा दावा केला जातो. मात्र, भारताने वेळोवेळी चीनच्या या दाव्याचे खंडन केले आहे. अरुणाचल प्रशात तणावाच्या परिस्थिती भर टाकण्याचं काम चीनकडून केलं जात असून हा भाग त्यांच्या देशाशी संलग्न असल्याचा दावा चीनकडून सतत करण्यात येत आहे. 2024 मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशमधील जवळपास 30 ठिकाणांची नावं बदलत त्यांना चिनी ओळख देत याची यादीसुद्धा जाहीर केली होती. भारताने मात्र ही यादी समोर येताच फेटाळून लावत चीनचा मनसुबा उधळून लावला होता. आता पुन्हा एकदा त्याच कृतीचे अनुकरण चीनने केल्याने याप्रकरणी भारताकडून काय पाऊले उचलली जाणार हे पहावे लागणार आहे.