जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर रेल्वेउड्डाण पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून ठेकेदारावर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी नगर रेल्वेउड्डाण पुलाचे बांधकाम आला गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. या कामास फक्त १८ महिने कालावधी देण्यात आला होता, परंतु सव्वा तीन वर्षात ही सदर पूल वाहतुकीसाठी मोकळा झालेला नाही. आज काल तर कोणी येऊन मक्तेदाराला मुदतवाढ देऊन मोकळा होत आहे. सदर मक्तेदार राजकीय दबाव वापरून काम पूर्ण करण्यास वेळ काढून धोरण अवलंबून वेगवेगळी कारणे देत आहे. वास्तविक या ठेकेदाराला कोणत्याही कामाचा पूर्वानुभव नाही, आणि शर्ती व अटीचा भंग केला असल्याने मक्तेदारावर आर्थिक दंड भरुन त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, राजू मोरे, सुनिल माळी, रिंकू चौधरी, अमोल कोल्हे, मजहर पठाण अकील पटेल, सुशील शिंदे, भगवान सोनवणे, विनायक पाटील, दिलीप माहेश्वरी, रहीम तडवी, किरण राजपूत, रागिब अहमद, सुहास चौधरी, जयश्री पाटील, किरण चव्हाण, राहुल होले, विनोद देशमुख, अर्चना कदम, जुन्नर खाटीक ,नवनाथ दारकुंडे, मनोज पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.