जळगाव : प्रतिनिधी
शिरसोली रोडवर दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या विनोद गोविंदा हटकर (३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे कि, जळगावकडून शिरसोलीकडे विनोद हटकर हे दि. २ मे रोजी जात असताना इकरा युनानी महाविद्यालयाजवळ त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोकों समाधान टहाकळे करीत आहेत.