मेष राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर राहील. सध्या ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. जवळच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. घरी काही चांगल्या कामाचे नियोजन होऊ शकते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याला बळी पडू नका. वैयक्तिक कामे तसेच कुटुंबाच्या व्यवस्थेकडे लक्ष द्या. व्यवसायाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक आहे.
वृषभ राशी
श्रीगणेश सांगतात, आज तुमची अध्यात्म आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल जाणवेल.कला आणि क्षमता इतरांसमोर सादर करण्याची संधी मिळू शकते. मुलांच्या सकारात्मक कार्यामुळे मन प्रसन्न राहील. जवळच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी संबंध बिघडू नयेत, याची काळजी घ्या.
मिथुन राशी
कोणत्याही कामात हृदयाऐवजी मनाचा आवाज ऐका. तुम्हाला नवीन शक्यता दिसू लागतील. आत्मविश्वासाने काम केल्यास अनेक समस्या सुटू शकतात. आज प्रवास टाळा. काही विशेष लाभ होण्याची शक्यता नाही. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तणावावर नियंत्रण ठेवा, नाहीतर कार्यक्षमता कमी होईल, असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यवसायासंबंधित कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. वैवाहिक सुखासाठी तुमचे सहकार्य आवश्यक आहे.
कर्क राशी
श्रीगणेश सांगतात की, ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही एखादे विशेष लक्ष्य साध्य कराल. संपर्क क्षेत्र मजबूत होईल. अती आत्मविश्वास तुमच्यासाठी घातक ठरू शकतो, याची जाणीव ठेवा. धार्मिक कार्यक्रमांमध्ये दिखाव्यापासून दूर राहा. मार्केटिंगच्या कामात व्यस्त राहू शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
सिंह राशी
श्रीगणेश म्हणतात की, आजची ग्रहस्थिती तुम्हाला स्वतःबद्दल विचार करायला आणि स्वतःसाठी काम करायला सांगते. या काळात घेतलेला कोणताही विचारपूर्वक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. धर्मकर्म आणि अध्यात्मिक कार्यांवर विश्वास राहील. मात्र अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा जवळच्या व्यक्तींशी संबंध खराब होऊ शकतात. जमिनीशी संबंधित कामांमध्ये फारशी अपेक्षा ठेऊ नका.
कन्या राशी
आज मार्केटिंग संबंधित कामात लक्ष केंद्रित करा. कोणताही फोन कॉल इत्यादी दुर्लक्षित करू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. ग्रहस्थिती तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढवेल. कोणतेही नियोजन करताना इतरांच्या मताला अधिक महत्त्व देऊ नका, नाहीतर चुकीच्या मार्गावर जाऊ शकता. आज भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी काहीसा वाद होऊ शकतो. व्यवसायातील चालू घडामोडी पूर्वीसारख्या चालू राहतील. जोडीदार आणि नातेवाईकांचे सहकार्य व सल्ला फायदेशीर ठरेल.
तुळ राशी
श्रीगणेश सांगतात की, आज संपर्क क्षेत्रात वाढ होईल. तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावशाली बनेल. न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो. मुलांसोबत आणि कुटुंबीयांसोबत खरेदी व मौजमजेचा आनंद घेता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थिती चांगली राहील. काही लोक तुमच्या यशाचा हेवा करून तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा.
वृश्चिक राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज तुमच्या वैयक्तिक बाबींची इतरांशी चर्चा करु नका. चर्चेविना केलेल्या कामात यश मिळेल. एखादे कठीण कार्य अचानक शक्य झाल्यामुळे मनात आनंद राहील. वस्तू, कागदपत्रे इत्यादी जपून ठेवा, गहाळ होण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. घरसंबंधी खर्च करायचा असेल, तर बजेटवर लक्ष ठेवा. व्यवसायातील तणावाचा घरावर परिणाम करू देऊ नका.
धनु राशी
श्रीगणेश सांगतात की, आज काही खास व्यक्तींशी संपर्क झाल्यामुळे तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल. कामाकडे अधिक जागरूकतेने आणि एकाग्रतेने पाहिल्यास यश मिळू शकते. जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या टीकेमुळे मन उदास होऊ शकते. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आणि तुमच्या योजना उघड करू नका. भागीदारीतील व्यवसायात पारदर्शकता ठेवणे महत्त्वाचे आहे.
मकर राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज दीर्घकाळ चालू असलेली चिंता दूर होऊ शकते. एखाद्या अनुभवी व्यक्तीशी चर्चा केल्यास योग्य मार्ग सापडेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नव्या यशाच्या दिशेने नेईल. पैशासंबंधी कोणत्यातरी विषयावर वाद उद्भवू शकतो. रागाच्या ऐवजी संयमाने परिस्थिती हाताळा. मुलांच्या एखाद्या कृतीमुळे चिंता होऊ शकते. विश्वासू मित्राशी चर्चा करून समस्या सुटू शकते. व्यवसायात कामाचा ताण व जबाबदाऱ्या वाढू शकतात.
कुंभ राशी
श्रीगणेश सांगतात की, आजचा इतरांना मदत केल्याने तुम्हाला मानसिक व आध्यात्मिक समाधान मिळेल. तुमच्या नम्र स्वभावामुळे नातेवाईक व समाजात सन्मान वाढेल. जवळच्या व्यक्तीशी वाद अचानक गंभीर रूप घेऊ शकतो. अती राग व चिडचिड केल्यास गोष्टी अधिक बिघडू शकतात. कोणत्याही वादविवादात अडकू नका. कमिशन संबंधित व्यवहारात सावधगिरी बाळगा.
मीन राशी
आज वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदीसंबंधी योजना होऊ शकते.तुम्ही मेहनतीच्या जोरावर कठीण कामही पूर्ण करू शकाल. संवादाद्वारे अनेक समस्या सुटू शकतात. जवळच्या नात्यांवर विश्वास ठेवल्यास संबंध अधिक मजबूत होतील. काहीवेळा गोष्टी मनासारख्या न झाल्याने मनात खिन्नता येते, पण संयम ठेवण्याची ही वेळ आहे. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता. पती-पत्नीमध्ये चांगले संबंध राहतील.