Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
    क्राईम

    लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

    editor deskBy editor deskMay 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, एमआयडीसी पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या घरफोडीच्या दोन आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा तांब्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जगवानीनगर गेटसमोर असलेल्या एका दुकानाचे शटर उचकावून आणि चैनल गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. त्यांनी दुकानातून सुमारे ३५० किलो वजनाचे ६५ हजार रुपये किमतीचे जुने तांबे आणि १५० किलो वजनाच्या १ लाख २० हजार रुपये किमतीच्या नवीन तांब्याच्या तारा असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आणि आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पथकातील पोलीस शिपाई राहुल घेटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, रितेश संतोष आसेरी (वय ४६, रा. रणछोडदास नगर, जळगाव) याला त्याच्या घरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचा साथीदार रणजीतसिंग जिवनसिंग जुन्नी (वय ३२) याला पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, किरण पाटील आणि राकेश बच्छाव यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हस्तगत करण्यात आला. सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, रवी नरवाळे आणि अक्रम शेख यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी आरोपींकडून ५४ हजार रुपये किमतीचे १०० किलो वजनाचे जुने आणि नवीन तांब्याचे तार जप्त केले आहेत. सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.

    या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, रवी नरवाळे, अक्रम शेख यांचा सहभाग होता.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.