भडगाव प्रतिनिधी । बसस्थानक परिसरात एटीएम कार्डच्या मध्यमातून शेतकऱ्याकडून पीनकोड विचारून ४० हजार रूपये लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, भगवान गिरधर पाटील (वय-६०) रा. शिरसमणी ता. पारोळा जि.जळगाव हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ५ एप्रिल रोजी कामाच्या निमित्ताने ते भडगाव शहरात आले होते. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास भडगाव बसस्थानकासमोरील ॲक्सीस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात तीन जन एटीएम जवळ आले. त्यांनी शेतकऱ्याचे कार्ड गोडबोलून अदलाबदली करून घेतले. त्यावेळी त्यांनी कार्डचा पासवर्ड विचारून घेतला. अज्ञात भामट्यांनी एटीएम कार्ड व पासवर्ड वापरून खात्यातील ४० हजाराची रोकड परस्पर काढून घेतली.हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय जाधव करीत आहे.