Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्रिपदासाठी लाचारी पत्करली ; आ.खडसेंचा टोला !
    क्राईम

    पालकमंत्रिपदासाठी लाचारी पत्करली ; आ.खडसेंचा टोला !

    editor deskBy editor deskMay 13, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्यात आपलेच सरकार असल्याने कुठूनही कामे करता येतील. मात्र, काही जण नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी लाचारी पत्करत असल्याचा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेता लगावला.

    अनेक महिन्यांपासून नाशिकला पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. नाशिकची धुरा कोणाकडे जाणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. सध्या मला पालकमंत्री करा, अशी मागणी करत लाचारी पत्करण्याचे काम काही जणांकडून होत आहे. मात्र, कशाला हवे पालकमंत्रिपद जिथे दिले तिथे काम करावे. संपूर्ण राज्यात आपलीच सत्ता आहे, अशी पुष्टी खडसे यांनी यावेळी जोडली. तसेच काहींनी विशेष कारणासाठी पालकमंत्रिपदासाठी आग्रही भूमिका मांडल्याचा आरोपही केला. कुंभमेळ्याची अनेक कामे रखडलेली आहेत. मुळात पालकमंत्री असेल तरच कुंभमेळ्याची कामे होतात, असे काही नाही. ती जबाबदारी सरकारची आहे. प्रशासन आणि इतर मंत्री याबाबत पुढाकार घेऊन कामाला वेग देऊ शकतात त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी खडसे यांनी केली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.