• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धुळ्यातील तिघांसह पाच जणांना नागपूरला खदानीत जलसमाधी !

editor desk by editor desk
May 13, 2025
in क्राईम, जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
धुळ्यातील तिघांसह पाच जणांना नागपूरला खदानीत जलसमाधी !

नागपूर : वृत्तसंस्था

फिरायला जात आहोत, असे सांगून नागपूर येथून कुही फाट्यालगत गिट्टी खदानच्या खोल खड्यात पाच जणांना जलसमाधी मिळाली. मृतकांमध्ये धुळ्याच्या एकाच कुटुंबातील आई व तिच्या दोन लेकरांचा समावेश आहे. धुळ्यातील ही मंडळी माहेरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आली होती.

सविस्तर वृत्त असे कि, रज्जु उर्फ रंजना सूर्यकांत राऊत (२२, नागपूर), रोशनी चंद्रकांत चौधरी (३२), मोहीत चंद्रकांत चौधरी (१०), लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (८, तिघेही रा. लक्ष्मी नगर धुळे) व एहतेशाम मुक्तार अन्सारी (२०, नागपूर) यांचा मृतांत समावेश आहे. पाचही जण याठिकाणी पोहताना ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.   हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची माहिती चौधरी कुटुंबियांना सोमवारी दुपारी ३ वाजता मिळाली. त्यानंतर पती चंद्रकांत आणि त्यांचे भाऊ पंकज चौधरी तातडीने नागपूरकडे रवाना झाले. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मृतांवर नागपूरलाच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नागपूर येथे माहेरी आलेल्या रोशनी चौधरीचा १० मे रोजी वाढदिवस होता. नागपूरला आई वडील व लहान बहिणीसोबत त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यानंतर व्हॉटस्अॅपवर स्टेटस फोटोही ठेवले होते. वाढदिवसाला परिसरातील नातेवाईक देखील आले होते. माहेरी आपल्या आई, वडील आणि बहिणीसोबत साजरा केलेला वाढदिवस हा रोशनी यांच्यासाठी शेवटचा ठरला. कारण दुसऱ्या दिवशीच ही दुर्देवी घटना घडली.

रात्री उशीरापर्यंत परत न आल्याने वडील सूर्यकांत त यांनी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार नोंदविली. दुसरीकडे या कुटुंबीयांसमवेत एहतेशाम हा सुद्धा गेला होता. तो सुद्धा परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले होते. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने सायबर विभागाला लोकेशन ट्रेस करण्याची सूचना केली. सोमवारी सकाळी रोशनी हिचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. गिट्टीखदानच्या कडेला एक दुचाकी, चप्पलचे जोड आणि कपडे पडून होते. ओळख पटली. अन्य चार जणांचे प्रेत गोताखोरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले.

Previous Post

किरकोळ कारणांमुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज होऊ शकतात.

Next Post

रेल्वेतच झाला प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

Next Post
रेल्वेतच झाला प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

रेल्वेतच झाला प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव

वादग्रस्त प्रफुल लोढा प्रकरणी मंत्री गिरीश महाजन दिल्लीतील राजकीय घडामोडीमुळे अडचणीत

July 26, 2025
धरणगाव

माजी जि प सदस्य गोपाल चौधरी यांचे नाव मतदार यादीतून गायब

July 26, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

जळगावात लाच घेताना महिला अधिकारी रंगेहाथ अटक

July 24, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भीषण अपघातात तरूणाचा मृत्यू; दुसरा जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल !

July 24, 2025
मंत्री महाजन व आ.खडसेंची फेसबुकवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी !
क्राईम

मंत्री महाजन व आ.खडसेंची फेसबुकवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी !

July 24, 2025
कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक; राज्यभरात प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन !
राजकारण

कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक; राज्यभरात प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन !

July 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp