भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील गंगाराम प्लॉट भागातील प्रौढ इसमाने स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम प्लॉटमधील नमस्कार मंडळाच्या मागे रहिवासी असलेले डिगंबर बढे ( वय ५२ ) यांनी आज दि.१२ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाची चक्रे फिरवली होती. . पोलीस निरिक्षक राहूल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला होता. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.