Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मजूराचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप
    क्राईम

    डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मजूराचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 5, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावेळी शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

    याबाबत माहिती अशी की, अवचित काळू तायडे (वय-४६) रा. समता नगर, जळगाव यांची सोमवारी ४ एप्रिल रोजी दुपारी अचानक प्रकृती खालवली. डाव्या बाजूने पॅरालिसीस सारखा त्रास होत होता. नातेवाईकांना त्यांना तातडने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

    दरम्यान, रात्री ११ वाजता रूग्णालयात उपचार सुरू असतांना अवचित तायडे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काळे याचा मृत्यू झाला आहे असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असुन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

    अवचित काळे यांना रूग्णालयात भरती करून पाहिजे तसे उपचार केले नाही. त्यांना दिवसभर केवळ सलाईन लावून ठेवले तर रात्री ऑक्सीजन लावला मात्र ऑक्सीजन नळीही व्यवस्थित मशीनला न लावता जमिनीवर पडलेली असल्याचे दिसून आले. याबाबतचा व्हिडीओसुध्दा नातेवाईकांकडे आहे. नंतर अचानक हॉस्पिटलमध्ये मेंदूचे डॉक्टर नसल्याचे उत्तर नातेवाईकांना दिल. त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागेल असे सांगण्यात आले. परंतू काही करण्याच्या आत काळे याचा मृत्यू झाला.

    डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अवचित काळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत अवस्थेत काही यांचे जावई सुनील पवार, भाचा विकास अडकमोल, पुतण्या उत्तम तायडे यांनी केला आहे. संबंधित डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही माहीत अवचित का यांच्या नातेवाईकांनी केली असून याबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.