नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला हादरला दिला. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर कारवाया सुरू झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात जम्मू काश्मीर सीमारेषेवर तैनात बीएएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज शहीद झाले आहेत. रविवार (11 मे) रोजी जम्मूतील फ्रंटियर मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यंत पाच जवानांना वीरमरण आले आहे.
जम्मू सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ‘आम्ही 10 मे 2025 रोजी आर एस पुरा क्षेत्रातील, जिल्हा जम्मू येथे अंतराष्ट्रीय सीमारेषेवर क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये बीएसएफचे बहादुर सब इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांना वीरगती प्राप्त झाली. देशसेवेच्या रक्षणात मोहम्मद इम्तियाज यांनी सर्वोच्च बलिदान दिलं असून त्यांच्या शौर्याला सलाम!’ असे सुरक्षा दलाच्या अधिकृत ट्वटिर अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पहलगाम हल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध ताणले गेले. ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतावर वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न भारताने हाणून पाडले.
10 मे 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम देण्यात आल्याची घोषणा भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केली. पण काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा सीमावर्ती भागात गोळीबार केला. त्यामुळे पुन्हा एकदा पाकड्यांचे नापाक कारनामे समोर आले आहेत.