Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात कर्ज घेऊन वित्त संस्थेला ३२ लाखांचा चुना !
    क्राईम

    जळगावात कर्ज घेऊन वित्त संस्थेला ३२ लाखांचा चुना !

    editor deskBy editor deskMay 11, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    बनावट कागदपत्रांच्या आधारे १४ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज घेतले तर दुसऱ्या एका प्रकरणात १७ लाख १९ हजार रुपयांच्या कर्जासाठी गहाण ठेवलेली जागा कर्जदाराने परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारातून वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची ३१ लाख ६२ हजार रुपयांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, फेडरल बँकेशी संलग्न फेडबँक फायनान्सियल सर्व्हिसेस या वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या जळगाव कार्यालयात खडगाव, ता. जामनेर येथील योगेश भाऊराव गवांदे व भाग्यश्री भाऊराव गवांदे यांनी मालमत्ता गहाण ठेवून ८ जून २०२२ रोजी १४ लाख ४३ हजार रुपये कर्ज घेतले. ७ जून २०२३ पर्यंत या कर्जाचे हप्ते भरले. त्यानंतरचे हप्ते भरले नाही. बँकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली असता कर्जासाठी गहाण मालमत्तेची कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या एका प्रकरणात पाचोरा येथील आकाश गोरख पाटील, त्यांची पत्नी पूजा आकाश पाटील, वडील गोरख खुशाल पाटील, आई सुनीता गोरख पाटील यांनी ८ जून २०२२ रोजी १७ लाख १९ हजार रुपये कर्ज घेतले. त्यासाठी त्यांनी पाचोरा येथील मालमत्ता गहाण ठेवली. हप्ते पूर्ण न भरता ही मालमत्ता परस्पर विकण्यात आली.

    कर्ज प्रकरणात एकूण ३१ लाख ६२ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आलेली दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असली तरी ही दोन्ही कर्जे एकाच दिवशी अर्थात ८ जून २०२२ रोजी घेतलेली आहेत. एका प्रकरणात १३ महिने तर दुसऱ्या प्रकरणात २५ महिने हप्ते भरण्यात आलेले आहेत.  १४ लाख ४३ हजार रुपयांच्या कर्जासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये केवायसी कागदपत्रे, जागेसंबंधी ग्रामपंचायतची कर पावती, ग्रामपंचायतीचा जागेसंबंधीचा ठराव, गावठाण व फेरफार प्रमाणपत्र, गाव नमुना नंबर ८ अशी कागदपत्रे होती. ती आता बनावट असल्याचे स्पष्ट झाले.  याप्रकरणी वित्त संस्थेचे एरिया कलेक्शन मॅनेजर अरुण खोब्रागडे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.