• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावनजीक भीषण अपघात : पिता ठार, मुलगी जखमी !

editor desk by editor desk
May 11, 2025
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव
0
धरणगावनजीक भीषण अपघात : पिता ठार, मुलगी जखमी !

जळगाव : प्रतिनिधी

मुलीची परीक्षा झाल्यानंतर मारवड येथून जळगावकडे परतत असताना कार व लग्नाच्या वाहनाची वहऱ्हाडाच्या समोरासमोर धडक होऊन महेश सुरेश सोनार (५५, रा. विश्वकर्मा नगर, रामेश्वर कॉलनी) हे ठार झाले. या अपघातात मुलगी नयना महेश सोनार (१९) व महेश यांचे मित्र राजेश मिठूलाल धूत (४६, रा. दौलत नगर) हे गंभीर जखमी झाले.

सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील पिंप्रीजवळ शनिवारी (दि. १०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की यात कारच्या समोरचा भाग चक्काचूर होण्यासह वऱ्हाडाच्या वाहनाचेही नुकसान झाले. या घटनेत वहऱ्हाडीही जखमी झाले सोनार यांची मोठी मुलगी नयना हिची शनिवारी मारवड येथे परीक्षा होती. त्यासाठी ते राजेश धूत यांच्याससह कारने (एमएच १९ ईए ३१९४) मुलीला घेऊन मारवड येथे गेले होते. परीक्षा झाल्यानंतर तिघेही जळगावकडे परत येत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिंप्री गावाजवळ भोज, ता. धरणगाव येथे जात असलेल्या लग्नाच्या वन्हाडाचे वाहन व कारची समोरासमोर धडक झाली. यात सोनार ठार झाले. कारसोबत ज्या वाहनाचा अपघात झाला, त्या वाहनात लग्नाचे वन्हाडी होते. शनिवारी संध्याकाळी भोज येथे हळदीचा कार्यक्रम असल्याने वन्हाडी मंडळी तिकडे जात होती. या अपघातात वऱ्हाडींच्या वाहनामधीलही काही जण जखमी झाले. त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघात झाला त्यावेळी तेथून खासदार स्मिता वाघ या अमळनेरकडे जात असताना त्यांना ही घटना दिसली. त्यांनी या विषयी जळगावातील माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांच्याशी संपर्क साधून रामेश्वर कॉलनीतील काही जणांचा अपघात झाल्याची माहिती दिली. ही माहिती मयतांच्या नातेवाइकांना देण्यात आली. त्यानुसार ते रुग्णालयात पोहोचले. महेश यांच्या मृत्यूने सोनार कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेला आहे. अपघातात नयना सोनार व राजेंद्र धूत हे दोघं गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना खासगी रुणालयात हलविण्यात आले आहे.

Previous Post

वृद्धाला जीवे मारण्याची धमकी देत लुटले !

Next Post

जळगावात कर्ज घेऊन वित्त संस्थेला ३२ लाखांचा चुना !

Next Post
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगावात कर्ज घेऊन वित्त संस्थेला ३२ लाखांचा चुना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group