Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गतिरोधकावर दुचाकीला दणका : ५ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    गतिरोधकावर दुचाकीला दणका : ५ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskMay 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कानळदा-चोपडा रस्त्यालगत आमोदा-घार्डी जवळ कोणतीही परवानगी न घेताच उभारलेल्या गतिरोधकावर दुचाकीला दणका बसून, दुचाकीवरील आईच्या हातात असलेली ५ महिन्याच्या चिमुकलीचा रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वा. घडली. शुक्रवारी या गतिरोधकावर दुचाकी घसरून एक दाम्पत्यदेखील जखमी झाले.

    सविस्तर वृत्त असे कि, संदीप सोनवणे (वय २६, रा. देवगाव, ता. जळगाव) हे कोळन्हावी येथे माहेरी गेलेल्या त्यांच्या पत्नी ज्योती संदीप सोनवणे (वय २२) यांना घेऊन आमोदाकडून देवगावकडे जात होते. आमोदा-घार्डी या गावाजवळ उभारलेल्या गतिरोधकावर संदीप सोनवणे यांची दुचाकी आदळली, त्याचवेळी ज्योती सोनवणे यांच्या हातात असलेली त्यांची पाच महिन्याची चिमुकली गायत्री सोनवणे ही रस्त्यावर पडली चिमुकलीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

    शुक्रवारी दुपारी १ वाजता याच गतिरोधकावर दुचाकी घसरून दाम्पत्याचा अपघात झाला. या अपघातात निताबाई राजेंद्र पाटील (वय ४१, रा. सावखेडा खु., ता. जळगाव) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नियमबाह्य तयार केलेल्या गतिरोधकबाबत कारवाईची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.