Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जावयाचा प्रताप : पत्नीला भेटायला आला अन अल्पवयीन मेहुणीला घेवून पळाला !
    क्राईम

    जावयाचा प्रताप : पत्नीला भेटायला आला अन अल्पवयीन मेहुणीला घेवून पळाला !

    editor deskBy editor deskMay 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून, गर्भवती पत्नीस भेटण्यासाठी सासरी आलेल्या एका जावयाने आपल्या अल्पवयीन मेहुणीला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीची आई आणि संशयिताची सासू हिने फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोठी महिलेची मुलगी सध्या गर्भवती असून तिचा पती काही दिवसांपूर्वी सासरी राहण्यासाठी आला होता. दरम्यान, अल्पवयीन मेहुणीला तब्येतीची तक्रार असल्याचे सांगून जावयाने तिला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगितले. विश्वासाने त्यांनी मुलीला त्याच्यासोबत पाठवले. मात्र सायंकाळपर्यंतही दोघे घरी न परतल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चिंता वाढली.  कुटुंबीयांनी आसपासच्या गावांमध्ये शोधाशोध केली, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेतली. आणि जावयाविरुद्ध अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेल्याची तक्रार दिली. याबाबत गावात चर्चेला उधाण आले असून पळून गेलेल्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फत्तेपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.