पुणे : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे संकेत स्वतः शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. आमच्यातील एका गटाला अजित पवार यांच्यासोबत जावे, असे वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर भारतीय संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचे की विरोधी पक्ष सोबत, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षांतर्गत दोन मतप्रवाह असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. आमच्यातील एका गटाला आम्ही अजित पवार यांच्या सोबत जावे, असे वाटत असल्याचे शरद पवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. संसदेत विरोधी पक्षात बसायचे की सत्ताधारी पक्षात बसायचे? याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार यांनी The Indian Express ला दिलेल्या मुलाखतीत, त्यांच्या पक्षातील काही सदस्यांना अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याची इच्छा असल्याचे कबूल केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “आमच्यातील एका गटाला अजित पवार यांच्यासोबत जावे, असे वाटत आहे.” या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.
यापूर्वी, डिसेंबर 2024 मध्ये, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने शरद पवार यांच्या गटातील आठपैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर दिली होती. या प्रस्तावाने शरद पवार नाराज झाले होते आणि त्यांनी अजित पवार यांच्या गटातील वरिष्ठ नेत्यांना अशा प्रयत्नांपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. या घटनाक्रमांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि भविष्यातील राजकीय घडामोडींच्या शक्यता वाढल्या आहेत.