• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजित डोभाल यांना आला फोन : “साहेब, आता तरी माफ करा…” !

editor desk by editor desk
May 8, 2025
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
अजित डोभाल यांना आला फोन : “साहेब, आता तरी माफ करा…” !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताने बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. ड्रोनद्वारे मिसाईल डागण्यात आली. यामध्ये दहशतवादी, त्यांचे अब्बाजान ठार झाले. दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त झाले. भारताच्या या हल्ल्याने पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसला. भारताने ऑपरेशन सिंदूर पुढे न राबवण्याची घोषणा केली आहे. पण पाकड्यांची खुमखुमी काही कमी झालेली नाही. पाकिस्तानने रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. पीएम शहबाज शरीफ यांनी हल्ला करण्याची पोकळ धमकी दिली आहे. योग्य उत्तर कसं द्यायचे हे पाकिस्तानला माहिती असल्याचा दावा त्याने केला. पण भारताने जेव्हा हल्ला चढवला त्यावेळी एक मोठी घटना घडली. ऑपरेशन सिंदूरनंतर लागलीच हा फोन आला. पाकचे NSA असीम मलिक यांनी अजित डोभाल यांच्याशी संपर्क केला. त्याची आता चर्चा रंगली आहे.

अजित डोभाल यांच्याशी असीम मलिक यांनी तातडीने संपर्क साधला. याविषयीची माहिती पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी एका मुलाखतीत दिली. टीआरटी वर्ल्ड या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात एनएसए स्तरावर संपर्क झाल्याचे ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशात कोणताही संपर्क अथवा चर्चा झाली नव्हती. पण ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सल्लामसलत झाल्याचे ते म्हणाले. दहशतवाद आणि चर्चा हे एकाच वेळी सुरू ठेवण्यात येऊ शकत नाही, हे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानवर एक प्रकारे बहिष्कार टाकला आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये घुसत दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. भारत अशी कारवाई करेल याची अपेक्षा पाकिस्तानला नव्हती. पाकिस्तानला हल्ल्याची भीती होती. पण याप्रकारे एअर स्ट्राईक होईल याची त्यांना खात्री नव्हती. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केवळ दहशतवादी ठिकाणांवरच हल्ला करण्यात आला. लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नाही हे भारताने स्पष्ट केले. या हल्ल्याने जगात पाकची नाचक्की झाली आहे. डोभाल आणि मलिक यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती मिळाली नसली तर परराष्ट्रमंत्र्यांचा सूर पाहता पाकिस्तानने हल्ले थांबवण्याची विनंती केल्याचे स्पष्ट होत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बळेबळेच आता युद्धाची भाषा केली आहे. देशाला संबोधित करताना त्यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी दिली. त्यामुळे दोन्ही देशात युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. रशियासह अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी भारताची कारवाई योग्य ठरवली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आगळीक केली तर ते त्याला महागात पडण्याची शक्यता अधिक आहे.

Previous Post

वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा आहे !

Next Post

मोठी बातमी : ‘ऑपरेशन सिंदूर’, 100 दहशतवाद्यांचा खात्मा !

Next Post
मोठी बातमी : ‘ऑपरेशन सिंदूर’, 100 दहशतवाद्यांचा खात्मा !

मोठी बातमी : ‘ऑपरेशन सिंदूर’, 100 दहशतवाद्यांचा खात्मा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group